जळगाव : जळगाव नजीक वडनगरी फाटा येथे कथा वाचक प्रदिप मिश्रा यांची शिव महापुराण कथा सध्या सुरु आहे. या ठिकाणी होणा-या गर्दीचा गैर फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणा-या सुमारे 20 ते 22 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. कथेच्या पहिल्या दिवशी महिला चोरांनी आपली हात की सफाई सुरु केली.
या चोरट्या महिलांच्या टोळीने तिघा महिलांभोवती घेराव घालून त्यांना धक्काबुक्की करत 96 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र बळजबरी चोरुन नेल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक नयन पाटील करत आहेत.