अर्भकाची गुपचुप विल्हेवाट उघडकीस

On: December 8, 2023 9:42 AM

जळगाव : पुरुष जातीच्या अर्भकाची गुपचूप विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे अमळनेर शहर व परिसरात खळबळ माजली आहे.

अमळनेर शहरातील कसाली डी.पी. पासून काही अंतरावर असलेल्या अमळनेर चोपडा रस्त्यावरील बोरी नदीच्या फरशी पुलाखाली पुरुष जातीचे अर्भक 7 डिसेंबरच्या सकाळी आठ वाजेच्या सुमारास आढळून आले. या घटनेची माहिती अमळनेर पोलिस स्टेशनला ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदारास समजली. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती या भागात ड्युटीवर असलेल्या हे.कॉ. संतोष पवार यांना दिली. घटनास्थळी मिळून आलेल्या अर्भकास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. या घटनेचा तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment