पुण्यात निवृत्त पोलिसावर हल्ला – घटना सीसीटीव्हीत कैद

On: August 27, 2020 6:47 PM

पुणे : पुण्यात सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करत अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्याच्या शिवाजी रस्त्यावर घडलेलीही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्वारगेट वसाहतीत राहणारे प्रकाश जयकुमार बुरले (58) यांनी खडक पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी प्रकाश बुरले यांच्या खिशातून मोबाइल हिसकावून पळ काढला होता. बुरले यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता त्यांच्यावर चोरट्यांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केला होता. सर्व घटनाक्रम रस्त्यावरील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे.तपास खडक पोलिस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment