संस्कार परिवारतर्फे गीता जयंतीनिमीत्त गिता पठणाचा कार्यक्रम

जळगाव : गेल्या पंचवीस वर्षाची परंपरा असलेल्या जळगाव शहरातील संस्कार परिवारातर्फे यावर्षी गीता जयंतीनिमीत्त गीता पठनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 22 डिसेंबर रोजी पांजरापोळ नेरी नाका येथे आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शहरातील 18 शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. संस्कार परिवाराच्या संयोजीका सौ. संतोष नवाल यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत विस ते पंचवीस सदस्या हजर होत्या.

संस्कार परिवारातर्फे आयोजीत गीतापठन कार्यक्रमात हवन, यज्ञ, गोपुजा, ध्यान, हनुमान चालिसा अशा विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना गीतेचे महत्व समजावे, त्यांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमात सहभाग घ्यावा यासाठी अठरा शाळेत जावून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

संस्कार परिवाराची पंचविस वर्षापुर्वी सुरुवात झाली त्यावेळी केवळ पंधरा महिला सदस्या होत्या. आता या परिवारात चारशेहून अधिक सदस्या आहेत. विशेष म्हणजे या परिवारात कुणी अध्यक्षा अथवा सेक्रेटरी नाही. प्रत्येक सदस्य महिला आपापल्या परिने पदरमोड करुन एकजुटीने उपक्रमाला आर्थिक हातभार लावत असते. गेल्या पंचवीस वर्षात या परिवाराकडून विविध सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here