जळगाव : एटीएम मशिनमधे भरण्यास दिलेली रक्कम पुर्ण स्वरुपात न भरता थोडी थोडी अशी एकुण 64 लाख 82 हजार 200 रुपये स्वत:च्या फायद्यासाठी काढून घेणा-या दोघांसह त्यांना मदत करणा-या ऑडीटर विरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण देविदास गुरव, दिपक भिकन पवार (दोघे रा. पाटणादेवी रोड आदित्यनगर चाळीसगाव) आणि ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (रा. गुजराल पेट्रोल पंपनजीक जळगाव) अशी गुन्हा झालेल्या तिघांची नावे आहेत.
चाळीसगाव शहरातील दोन पाचोरा शहरातील दोन अशा चार एटीम मशीनमधे पैसे भरण्याची जबाबदारी प्रविण गुरव आणि दिपक पवार या दोघांवर देण्यात आली होती. संबंधीत कंपनीवर संबंधीत बॅंकांनी ही जबाबदारी दिली होती. कंपनीचे कर्मचारी असल्याने बॅंकांनी विश्वासाने दोघांना वेळोवेळी रक्कम एटीएम मशिनमधे भरण्यास दिली होती. मात्र दोघांनी ती रक्कम पुर्ण स्वरुपात न भरता ती प्रत्येकवेळी कमी स्वरुपात भरली. ती रक्कम 64 लाख 82 हजार 200 रुपये झाल्यानंतर निदर्शनास आले. या दोघांना ऑडीटर चंद्रशेखर गुरव यांनी मदत केल्याचे देखील निदर्शनास आले. हा प्रकार कंपनीच्या निदर्शनास आणून देण्याऐवजी कंपनीस खोटा ऑडीट अहवाल देवून दोघांचा बचाव करण्याचे काम ऑडीटरने करुन कंपनीचा विश्वासघात करुन अपहार केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सुहास आव्हाड करत आहेत. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.