दिवंगत खेळाडू मित्रांच्या स्मृतीप्रित्यर्थ मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धा

जळगाव – जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे  दिवंगत खेळाडू मित्रांच्या स्मृतीप्रित्यर्थ  दरवर्षी मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. यंदाची ही सलग अकरावी स्पर्धा असून रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज मैदानावर होणार आहे. १९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकात सोबत खेळलेले खेळाडू दिवंगत मित्रांच्या आठवणीत  दरवर्षी मैदानात उतरत असतात.अशा प्रकारची राज्यातील ही एकमेव स्पर्धा आहे, ही जी सलग अकरा वर्षांपासून जळगांवात आयोजित करण्यात येत आहे.

स्व.सुरेशभाऊ अग्रवाल,स्व.गंगाराम मामा शिरसाठ,स्व.अजय चिंचोले,स्व.प्रभाकर भोळे,स्व.प्रसादअय्यर, स्व.दीपक पिसुटे (बंडू मामा), स्व.आदिल खान,स्व.भैय्या सानप,स्व.राजेंद्र साळुंखे,स्व.समीर पाटील,स्व.विजय माळी,स्व.हेमंत गाला,स्व.संजय रोंदळ,स्व.पंकज केंकरे,स्व.विजय चौगुले,स्व.बाबु अय्यर,स्व.अजित आचार्य,स्व.चंदू चौधरी,स्व.जितेंद्र माची,स्व.इम्रान सय्यद,स्व.डॉ. अविनाश पाटील,स्व.राजु ओझा,स्व.राजु जाधव,स्व.हसमुख जानी,स्व.दिलीप शिरसाठ,स्व.सुरज कुकरेजा,स्व.सुनिल पाटील,स्व.योगेश खैरनार,स्व.साधुराम मंधवाणी,स्व.अनिल कुलकर्णी,स्व.तुषार चिंचोले,स्व.राजेश चंदन,स्व.प्रा. चंद्रकांत हिंगोणेकर,स्व.देवेन पिल्ले,स्व.राजु बोरसे,स्व.मनिष जोशी,स्व.किरणभाऊ दहाड,स्व. जगदीश शुक्ला, स्व. संतोष तेजवाणी या  दिवंगत खेळाडू मित्रांना ही स्पर्धा श्रद्धांजलीपूर्वक समर्पित असते.

रविवारी सकाळी  नऊ वाजता होणाऱ्या उदघाटन प्रसंगी आ. राजुमामा भोळे, माजी आ.अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे, उद्योगपती श्रीरामभाऊ खटोड, सिनिअर एक्साईज इन्स्पेक्टर मनोज चौधरी(मुंबई),सिनेट सदस्य ऍड. केतन ढाके,एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर,सुरेश कलेक्शनचे मुकेशभाई हासवाणी,मातोश्री फायनान्सचे अभिजित पाटील, गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर अनिलभाऊ सोनवणे,अपर्णा ऑटोमोटिव्हचे किरण कासार, अमळनेर अर्बन बँकेचे अध्यक्ष अभिषेक पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. ह्या प्रसंगी आजी, माजी खेळाडू मित्रांनी उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजु खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी, कोषाध्यक्ष बाबा शिर्के, युवराज वाघ, ऍड. नितीन देवराज यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here