बलात्कारातून तरुणी गर्भवती, डॉक्टरने केला बेकायदा गर्भपात

On: January 16, 2024 1:35 PM

जळगाव : बलात्कारातून तरुणी गर्भवती झाल्याचा प्रकार जामनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. याशिवाय या तरुणीचा एका डॉक्टरने बेकायदा गर्भापात केल्याचे देखील उघडकीस आले आहे. या खळबळजनक घटने बाबत शासकीय डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पहुर पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील मांडवे गावाच्या नदीवर एक तरुणी कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत एकाने तिला बळजबरी नदीच्या बाजुला ओढत नेवून तिच्यावर बलात्कार केला. तीन ते चार वेळा हा प्रकार झाल्याने ती तरुणी गर्भवती झाली. हा प्रकार कुणाला सांगायचा नाही अन्यथा जीवे ठार केले जाण्याची धमकी तिच्यावर अत्याचार करणा-याने तिला दिली.   

हा संतापजनक प्रकार तिने गावातील अन्य महिलेला सांगितला. समाजात बदनामी होईल या भितीपोटी त्या महिलेसह अजून एकाने अशा दोघांनी तिला एका डॉक्टरकडे नेले. कायदेशीर अधिकार नसतांना त्या डॉक्टरने त्या पिडीतेचा गर्भपात केला. याप्रकरणी शासकीय डॉक्टरांनी संबंधीत चौघांविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय बनसोड करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment