गर्भपात करुन अर्भक गटारीत फेकणा-या मातेविरुद्ध गुन्हा

On: December 26, 2023 8:46 AM

जळगाव : अनैतिक संबंधातून वाढीस लागलेल्या अर्भकाचा गर्भपात करुन त्यास गटारीत फेकून देणा-या अज्ञात मातेविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे तिन ते चार महिन्याचे हे अर्भक होते. या घटनेमुळे यावल परिसरात खळबळ माजली आहे.

यावल तालुक्यातील सावखेडा सिम या गावी निसार तडवी यांच्या घरासमोरील गटारीत हे अर्भक आढळून आले. पोलिस पाटील पंकज जीवन बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक वसिम तडवी पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment