कोरोनाचा जीएसटीवर झाला परिणाम

नवी दिल्ली : राज्यांना महसूल नुकसान भरपाई देणाच्या मुद्द्यावर गुरुवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्र सरकारने स्पष्ट केले की, कोरोना विषाणूचा परिणाम जीएसटी वसुलीवर झाला आहे. वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये जीएसटी महसूलात 2.35 लाख कोटी रुपये कमी येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती. केंद्र सरकारकडून सन 2019-20 या वित्तीय वर्षासाठी राज्यांना जीएसटी नुकसान भरपाई 1.65 लाख कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. मार्चच्या 13,806 कोटी रुपयांचा सुद्धा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here