जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चौघांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सुपडू बंडू तडवी (रा. चिलगाव ता. जामनेर), योगेश भरत राजपूत (रा. इंदिरा नगर आवास जामनेर), शेख शाहरुख शेख हसन (रा. इमामवाडा रावेर) आणि योगेश देविदास तायडे (रा. महेश नगर भुसावळ)अशी चौघा गुन्हेगारांची नावे आहेत.
जामनेर पोलिस स्टेशन हद्दीतील योगेश राजपूत याच्याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला एकुण सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे करण्यात आली आहे. पहुर पोलिस स्टेशन हद्दीतील सुपडू तडवी याच्याविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला एकुण सोळा गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध तिनवेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. त्याचीअमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेख शाहरुख याच्याविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला पाच गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध दोन अदखलपात्र गुन्हे दाखल असून पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. त्याची कोल्हापूर मध्यवर्तीकारागृहात रवानगी करण्यात आली आहे. योगेश तायडे याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला सहा गुन्हे दाखल असून एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे.त्याची नागपुर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.