चाकूहल्ल्यासह दवाखान्याचे नुकसान – चाळीसगावला दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : चाकूहल्ल्यासह वैद्यकीय स्टाफसोबत हुज्जतबाजी आणि दवाखान्याच्या काचा फोडून नुकसान करणा-या दोघांविरुद्ध चाळीसगाव  शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरात गुंडगिरी फोफावली असल्याचे या घटनेच्या निमीत्ताने बोलले जात आहे.

चाळीसगव शहरातील धनंजय विजय विसपुते आणि पवन विजय विसपुते हे दोघे जण आपसात वाद करत होते. त्यावेळी मच्छिंद्र गोत्रे हे त्यांना समजावण्यास गेले. समजावण्यास आलेल्या मच्छिंद्र गोत्रे यांना दोघा विसपुते बंधूंनी चापटाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. काकांना होत असलेली मारहाण बघून त्यांचा पुतण्या प्रविण विलास गोत्रे व इतरांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पवन विसपुते याने मच्छिंद्र गोत्रे यांच्या छातीला चावा घेतला. धनंजय विसपुते याने प्रविण गोत्रे यांच्या पोटात चाकूने घाव घातला. घाबरुन प्रविण गोत्रे पळून जात असतांना त्यांच्या उजव्या मांडीवर घाव बसला.

या घटनेत मच्छींद्र गोत्रे आणि प्रविण गोत्रे हे काका पुतणे जखमी झाले. घटनास्थळी पोलिस गेले असता त्यांच्याशी देखील संशयित आरोपींनी झटापट केली. दोघा विसपुते बंधूंना सरकारी दवाखान्यात उपचारकामी नेले असता तेथील वैद्यकीय स्टाफसोबत त्यांनी हुज्जत घालून शिवीगाळ केली. तसेच ट्रामा सेंटरच्या काचा फोडून नुकसानकेले. प्रविण गोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धनंजय विसपुते व पवन विसपुते या दोघा बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. दिपक बिरारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here