अल्पवयीन मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

On: January 4, 2024 1:58 PM

जळगाव : अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. जळगाव शहरात असलेल्या आय एम आर कॉलेज नजीक तसेच एका खाजगी क्लास नजीक हा प्रकार घडला. जळगाव शहरातील एका खाजगी क्लासमध्ये हे दोघे अल्पवयीन परिक्षेची तयारी करत होते. 

जुलै 2022  ते मार्च 2023 या कालावधीत खाजगी क्लास मध्ये शिक्षण घेत असताना अल्पवयीन मुलाने पिडीत अल्पवयीन मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. या धमकीच्या बळावर त्याने तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले.

अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment