“मी गावचा पोलिस पाटील” म्हणत शिवीगाळ, मारहाण

On: January 5, 2024 12:07 PM

जळगाव : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास समजावण्यासाठी आलेल्या लोकांना शिवीगाळ आणि मारहाण तसेच विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाने तरुणीचा विनयभंग केला तर दुसऱ्याने “मी गावचा पोलीस पाटील आहे” अशी धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण केली. केशव शिंदे आणि आशिष शिंदे अशी गारखेडा ता. जामनेर येथील रहिवासी असलेल्या व गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या घटनेतील पीडित फिर्यादी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती शेतात मजुरीने काम करत होती. शेतात काम करत असताना केशव शिंदे याने तिला पाठीमागून दगड मारून तिच्या छातीकडे एकटक पाहिले. तुझा मोबाईल नंबर मला दे असे म्हणून तिचा विनयभंग केला.

पीडित तरुणीसह काहीजण केशव शिंदे यास समजावण्यास गेले. त्याचा राग आल्याने आशिष शिंदे याने त्यांना शिवीगाळ व काठीने मारहाण केली. मी तुम्हाला पाहून घेईन मी गावचा पोलीस पाटील आहे असे म्हणत धमकी दिली. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment