पत्रकार गणेश वाघ सन्मानित

On: January 6, 2024 9:40 PM

जळगाव : भुसावळ येथील दैनिक तरुण भारतचे उपसंपादक गणेश रामकृष्ण वाघ यांना कै. कृष्णराव पाटील कोठवळे पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.  पत्रकार दिनाचे औचित्य साधत शुक्रवार, 5 जानेवारी रोजी नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने नाशिकच्या जुना आग्रा रोडवरील श्री कालिका मंदीर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, श्री कालिका देवी मंदिर संस्थान अध्यक्ष अण्णासाहेब व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील एका पत्रकाराची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यात भुसावळ तालुक्यातील गणेश वाघ यांची निवड करण्यात आली. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment