तरुणीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांना अटक  

On: January 7, 2024 11:46 AM

जळगाव : चोपडा तालुक्याच्या अडावद पोलिस स्टेशन हद्दीतील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील चौघांना अटक करण्यात आली आहे.    

चोपडा तालुक्यातील अठरा वर्षाच्या तरुणीवर एकाने व त्यापाठोपाठ इतर तिघांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केला. गफूर गबू तडवी हा 2 जानेवारी रोजी संबंधीत तरुणीच्या घरात गेला. तिला धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याने दिलेल्या जीवे ठार करण्याच्या धमकीला घाबरुन ती तरुणी त्याला भेटण्यासाठी यावल तालुक्यातील किनगाव येथे गेली.  

किनगाव येथील एका जागी प्रतीक राजेंद्र कोळी, पंकज बुधा कुंभार व अमोल शत्रुघ्न कोळी अशा तिघांनी मद्याच्या नशेत त्या तरुणीला अगोदर सहानुभुती दाखवली. मात्र त्यांनी देखील तिला जीवे ठार करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  4 जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटने प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अडावद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास स.पो. नि. गणेश बुवा करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment