जळगाव : जैन हिल्सवर सुरु असलेला कृषी महोत्सव शेतक-यांसाठी जणू पर्वणी ठरत आहे. 10 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेला हा कृषी महोत्सव 14 जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. “हायटेक शेतीचा नवा हुंकार” या स्लोगनने सुरु झालेला हा महोत्सव राज्यातील शेतक-यांसाठी ख-या अर्थाने एक दिशादर्शक महोत्सव ठरला आहे.
जैन हिल्सवर सुरु असलेला हा कृषी महोत्सव ख-या अर्थाने हायटेक शेतक-यांमधे आत्मविश्वास वाढवत असून त्यांच्या कृषीविषयक ज्ञानात भर देखील घालत आहे. कृषी महोत्सवाच्या सुरुवातीलाच जळगावचे प्रकल्प संचालक रविशंकर चलवदे यांनी फिल्डवर येऊन शेतक-यांनी जीवंत पिके बघावी असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला राज्याच्या विविध भागातून महोत्सवाला भेट देण्यासाठी येणारे शेतकरी ख-या अर्थाने प्रतिसाद देत आहेत. राज्याच्या विविध भागातून या महोत्सवाला भेट देणारे शेतकरी आपले लेखी मनोगत देखील व्यक्त करत आहेत.