जळगाव : माल उधार न दिल्याने रागाच्या भरात एकावर चाकू हल्ला, मारहाण, लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यप्रकाश कैलास कोळी हा तरुण जळगाव तलुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असून हॉटेल व्यावसायीक आहे. रॉकी अरुण कोळी हा तरुण जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी आहे. यावल तालुक्यातील कासवा येथील मारोती मंदीराजवळ दोघांचा उधार सामान देण्या घेण्याच्या विषयावरुन वाद झाला. सत्यप्रकाश कोळी याने रॉकी कोळी यास उधार सामान दिला नाही. त्यामुळे चिडून जावून रॉकी सह त्याचे साथीदार दिपक सुर्यभान सोनवणे, कल्पेश रविंद्र पाटील, दिनेश मधुकर पाटील व अक्षय दिपक जाधव (सर्व रा. कुसुंबा ता. जळगाव) आदींनी सत्यप्रकाश याच्यावर हल्ला केला.
रॉकी याने सत्यप्रकाश याच्या डोक्यावर लाकडी दांडा मारला. दिपक सोनवणे आणि दिनेश पाटील या दोघांनी सत्यप्रकाश याच्यावर चाकू हल्ला केला. कल्पेश पाटील व अक्षय जाधव या दोघांनी सत्यप्रकाश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गोदावरी हॉस्पीटल येथे वैद्यकीय उपचार घेत असतांना सत्यप्रकाश याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार फैजपूर पोलिस स्टेशनला पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक मैंनुद्दीनस सैय्यद करत आहेत.