दोन वर्षाच्या बालिकेसोबत गैरकृत्य – बलात्काराचा गुन्हा

On: January 11, 2024 9:47 AM

जळगाव : दोन वर्षाच्या अजाण बालिकेसोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात घडलेल्या या घटनेप्रकरणी कृष्णापूर येथील लोटन पाटील याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत बालिका ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिच्यासोबत संशयीताने हे कृत्य केल्याचे फिर्यादीन नमुद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी बलात्कार व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहेत.  संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment