गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसासह एकास अटक

On: January 11, 2024 11:09 AM

जळगाव : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले येथील तरुणास चोपडा ग्रामीण पोलिसांनी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. शुभम प्रकाश सुर्यवंशी (पतन कोडावली जुने बस स्टॅंडसमोर गोकुळ हॉटेल हातकणंगले जिल्हा कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील बोर अजंटी फॉरेस्ट नाक्यासमोर शुभम सुर्यवंशी यास तेरा हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली. पो.कॉ. गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. शेषराव नितनवरे करत आहेत. आरोपीस अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून चोपडा तालुक्यात गावठी बनावटीचे कट्टे घेण्यासाठी खरेदीदार येत असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment