मोबाईल चोरट्यास अटक – जिल्हापेठ पोलिसांची कामगिरी

जळगाव : रात्री शतपावली करणा-या इसमाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.

10 जानेवारी 2024 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास द्रौपदी नगरातील रहिवासी सुनिल भामरे हे शतपावली करत होते. शतपावली दरम्यान मानराज पार्क परिसरातील नवजीवन सुपर शॉप जवळ रस्त्यावर ते मोबाईलवर बोलत होते. ते मोबाईलवर बोलत चालत असतांना त्यांच्या हातातील मोबाईल भरधाव वेगात आलेल्या ट्रिपल सिट अज्ञात दुचाकी धारकांनी हिसकावून पलायन केले. या घटनेप्रकरणी सुनिल भामरे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल.

पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांनी आपले सहकारी हे.कॉ. सलीम तडवी, पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. अमितकुमार मराठे आदींना या तपासकामी सुचना दिल्या. गुप्त माहितीसह तांत्रीक मदतीच्या आधारे हा गुन्हा करणारा गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी यास ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील बबन कोळी याने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्या कब्जातून त्याने हिसकावलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा 80 हजार रुपयांचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक शांताराम देशमुख व पो.कॉ. सिद्दार्थ सुरवाडे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here