स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन महाशिबीराचे आयोजन  

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील गौराई कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे राष्ट्रीय युवक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवक दिनानिमित्त १३ जानेवारी ला सकाळी १० वाजता हे महाशिबीर होईल. एमपीएससी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, मंत्रालय सहाय्यक, सरळ सेवा, पोलीस भरती, सैन्य भरती इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकातर्फे विनामूल्य भव्य स्पर्धा परीक्षा महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महाशिबिर सकाळी दहा वाजता गौराई कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होईल.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर महानगर विकास प्राधिकरण चे उपसंचालक तसेच भगीरथ भारताचा भूगोल या पुस्तकाचे लेखक कपिल पवार तसेच स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ, संपूर्ण विज्ञान पुस्तकाचे लेखक जयदीप पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना आगामी वर्षात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा व त्यांची तयारी करण्याची पद्धती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या विविध प्रकाशनच्या पुस्तकांवर ५० टक्के पर्यंत सवलत उपलब्ध असणार आहे. तरी पंचक्रोशीतील युवक युवतींनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डी. आर.चौधरी, प्राचार्या रुपाली वाघ, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here