मैत्रीच्या बहाण्याने चालकास बोलावले — सेक्सी व्हिडीओ तयार करुन गंडवले!!

On: January 13, 2024 10:18 AM

जळगाव : महिलेने सुमधुर व मंजुळ आवाजात कॉल करुन वाहन चालकास बोलावून त्याचा महिलेसोबत सेक्स करतांना व्हिडीओ तयार करुन रोख रक्कम, दागिने व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतल्याची खळबळजनक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. या घटनेने जळगाव शहरात खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरात एका इमारतीत असलेल्या एका फ्लॅट मधे एका महिलेने एका वाहन चालकास मैत्री करण्याच्या बहाण्याने बोलावले. पलीकडून बोलणा-या महिलेचा मंजुळ स्वर कानावर पडताच त्याची कळी खुलली. तो वाहनचालक मनातून खुश झाला आणि त्या इमारतीत त्या महिलेला भेटण्यास गेला.

त्या ठिकाणी अगोदरच एक महिला व तिच्यासोबत दोन पुरुष साथीदार हजर होते. तिघांनी संगनमत करत त्या वाहनचालकाला मारहाण करत त्या महिलेसोबत सेक्स करण्यास भाग पाडले. या बळजबरी समागमाचा व्हिडीओ तयार करण्यात आला. त्या व्हिडीओच्या बळावर त्याला ब्लॅकमेल करण्यात आले. त्याच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा ऐवज काढून घेण्यात आला.

तयार करण्यात आलेला व्हिडीओ नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत त्याला अजून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. ती वसुल करण्यासाठी त्याला आव्हाणा शिवारात एका जागी नेण्यात आले. या घटने प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. किशोर पवार करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment