चोरीची मोटर सायकल विकत घेणाऱ्यास अटक

On: January 14, 2024 8:19 PM

जळगाव : चोरीची मोटारसायकल खरेदी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. फारुख हुस्नोद्दीन शेख असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. 

एरंडोल येथे राहणारा फारुख हुस्नोद्दीन शेख याने चोरीची हिरो शाईन कंपनीची मोटार सायकल विकत घेतली असून तो त्याचे घरी असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी स.पो.नि. निलेश राजपुत, पो.उ.नि. गणेश वाघमारे, हवालदार सुनिल दामोदरे, महेश महाजन, नंदलाल पाटील, संदिप सावळे, पो.ना. भगवान पाटील, पो.ना.राहुल बेसाणे, पो.ना. अशोक पाटील, पो.कॉ. ईश्वर पाटील आदींना पुढील तपासकामी रवाना केले. 

तपास पथकाने फारुख हुस्नोउद्दीन शेख (रा. मुल्लावाडा, एरंडोल ता. एरंडोल) यास चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेत चौकशी केली. चोरीची मोटारसायकल त्याने सराईत गुन्हेगार योगेश शिवाजी दाभाडे (रा. पथराड ता. भडगाव)  याच्याकडून खरेदी केल्याचे त्याने कबुल केले. 

जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल मोटारसायकल चोरीचा गुन्हा या तपासातून उघडकीस आला आहे. अटकेतील फारुख यास पुढील तपासकामी मोटारसायकल सह जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment