पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले शरण

On: January 15, 2024 1:16 PM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण आले आहेत. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांच्या अटकेसाठी वेळोवेळी आंदोलन देखील झाले होते.

15 जानेवारी रोजी सकाळी ते पोलिस अधीक्षक कार्यालयात शरण आले असून त्यांची चौकशी सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून ते फरार होते. यांचे निलंबन करून त्यांना नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील होते. त्यात त्यांना अपयश आले. त्यांच्या अडचणीत होत असलेली वाढ लक्षात घेता ते स्वत:हून पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment