प्राणघातक हल्ला करणा-यास अटक

On: January 18, 2024 11:07 AM

जळगाव : तरुणावर प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेसह जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ 16 जानेवारीच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला. या घटनेला अनुसरुन दगडफेक देखील झाली होती. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

येसाजी हेमराज चव्हाण (रा. बालाजीपेठ जळगाव) आणी भगवान सोनवणे (रा. शिवाजी नगर जळगाव) हे दोघे एकमेकांना परिचित आहेत. 16 जानेवारीच्या रात्री येसाजी चव्हाण आणि त्याच्या सोबत रोहन कुरकुरे हे दोघे जण खान्देश मिल कॉम्पलेक्स परिसरात फिरत होते. त्यावेळी येसाजी यास भगवानचा फोन आला. फोनवर भगवान याने येसाजी यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्याला शिवीगाळ का करतो याबाबत येसजी याने भगवानला विचारणा केली. त्यावर पलीकडून तु कुठे आहे असे भगवान याने येसाजी यास विचारले. त्यावर मी अ‍ॅक्सीस बॅंकेजवळ असलेल्या इलेक्ट्रीक डीपीजवळ असल्याचे त्याने सांगितले.

याठिकाणी भगवान व त्याच्यासोबत आलेल्या इतरांनी धक्काबुक्की सुरु केली. भगवान याने चॉपरने येसाजीवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पळून गेले.  जखमी येसाजी चव्हाण व रोहन कुरकुरे दोघे डॉ. भंगाळे यांच्या दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाले. याठिकाणी हे.कॉ. मिलींद सोनवणे यांनी त्याचा जवाब घेत गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेसह जळगाव शहर पोलिसांच्या पथकाने भगवान सोनवणे यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. रविंद्र बागुल करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment