अश्लिल व्हिडीओ, लैंगिक छळासह अल्पवयीन विद्यार्थ्यास खंडणीची मागणी

On: January 19, 2024 10:59 AM

जळगाव : जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा लैंगिक छळ करुन त्या घटनेचा व्हिडीओ तयार करुन त्याच्याकडून खंडणीची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून जळगाव शहरात खळबळ माजली आहे.

17 तारखेच्या रात्री पावणे आठ ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान नेहरु चौकानजीक एका मेडीकल दुकानाजवळून या पिडीत अल्पवयीन विद्यार्थ्याला तिघांनी मैत्रीच्या बहाण्याने बोलावून एका एका खासगी क्लासच्या बंद इमारतीत नेले. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला इतर तिघांनी नग्न करुन एकाचे पेनीस हातात घेण्यास भाग पाडले.

या घटनेचा त्या तिघांनी व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्या मित्राकडून 2100 रुपये फोन पे वर मागवून घेतले. याशिवाय त्याच्याकडे तिस हजार रुपयांची  खंडणी मागितली. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत. तिघांना अटक करण्यात आली आहे.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment