जळगाव : अश्लिल व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करणा-या पतीविरुद्ध पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय विविध स्त्री अत्याचार विषयक कारणावरुन तिच्या पतीसह सासु, सासरे तसेच इतर अशा एकुण बारा जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर येथील माहेर असलेल्या विवाहितेचे चोपडा येथील सासर आहे. पतीने आपल्याला अश्लिल व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक संबंध केल्याचा आरोप विवाहीतेनेन केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. संतोष पारधी करत आहेत.








