जळगाव : कर्जाचे हप्ते न फेडलेल्या घराचा बॅंकेने ताबा घेतला असतांना त्या घरात बेकायदा वास्तव्य करणा-या तिघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद चिंधु कोळी, चिंधु कोळी व निर्मला चिंधु कोळी (सर्व रा. आमोदा खुर्द ता. जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंक जळगाव या बॅंकेने आमोदा खुर्द या गावी घर ताब्यात घेतले होते. त्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा व नट खोलून त्यात बेकायदा वास्तव सुरु असल्याचे बॅंकेच्या लक्षात आले. बेकायदा वास्तव्य करणा-या तिघांविरुद्ध बॅंकेच्या वतीने अर्जुन रामराव शेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. रामकृष्ण इंगळे करत आहेत.