महिला पोलिस तरुणीवर अत्याचार

On: January 24, 2024 5:56 PM

जळगाव : मुंबई पोलिस दलाच्या सशस्त्र पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी तरुणीवर शरीरसंबंध ठेवणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसोली येथील संशयीत आरोपी तरुणाने या पिडीत महिला पोलिस तरुणीस वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध केले असल्याचा आरोप आहे.

8, 9, 10 आणि 11 जानेवारी 2024 असे सलग चार दिवस दोघांचा शरीरसंबंध आला असल्याचे महिला पोलिस तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. 8 ते 10 जानेवारी दरम्यान शिरसोली येथे आणि 11 जानेवारी रोजी रात्री तिन वाजता आढीवली ढोकली या गावी अनैसर्गिक बळजबरी शरीरसंबंध झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अमोल मोरे करत आहेत.    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment