जळगाव : दि. २४ फेब्रुवारी – जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन गुरुवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ ते बुधवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येणार आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १४, १७ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुली सांघिक अशा स्वरूपात घेतल्या जातील.
या स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शाळा या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकतात. नाव नोंदणीची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ असून संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणीसाठी व माहितीसाठी श्री किशोर सिंह (मोबाईल नंबर- ० ९४ २११ २११ ०६) यांच्याशी संपर्क साधावा. पत्ता:- जैन स्पोर्ट्स अकॅडमी, कांताई सभागृह, नवीन बस स्टँड जवळ, जळगाव. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव चे अध्यक्ष माननीय श्री अशोक भाऊ जैन आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अतुल जैन यांनी केले आहे.