शवविच्छेदनासाठी जाणारी रुग्णवाहिका पुलावरुन कोसळली

On: August 28, 2020 4:51 PM

मुंबई : डोंबिवली येथून एक रुग्णवाहिका शवविच्छेदनकामी मुंबईतील जेजे रुग्णालयात मृतदेह घेऊन जात होती. चेंबूरनजीक अमर महालजवळ टेम्बे पुलावरुन ही रुग्णवाहिका कोसळली. कोरोना महामारीमुळे सातत्याने रुग्णांची ने आण सुरु असते.

मध्यरात्री घडलेल्या या घटनेतील चालक, स्टाफ व मयतास बाहेर काढण्यात आले. थेट पुलावरुन कोसळलेली ही रुग्णवाहिका दुकानांच्या पत्र्यावर, स्लॅबवर लटकली होती. यावेळी गाडीचा चालक, कर्मचारी व मृतदेह असे सर्वजण जवळपास तासभर अडकून पडले होते. टिळक नगर पोलीस, फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या सर्वांची सुटका केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment