तलवारीसह हद्दपार आरोपीस अटक

On: January 29, 2024 10:17 PM

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीस तलवारीसह अटक करण्यात आली आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या हद्दपार आरोपीचे नाव आहे. 

हातात तलवार घेऊन दिनकर हा दहशत माजवत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीश गर्जे, मंदार पाटील आदींना त्यास ताब्यात घेण्या कमी रवाना केले. 

अटकेतील दिनकर चव्हाण यास न्यायमूर्ती श्रीमती जे एस केळकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे या गुन्ह्यासह त्याच्यावर एकूण 22 गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment