एमपीडीए कायद्याखाली दोघांवर स्थानबद्धतेची कारवाई

On: January 30, 2024 5:43 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील दोघा गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील रमन  उर्फ माकु बापू नामदास (रा.  मुठे चाळ स्टेशन रोड अमळनेर) आणि जामनेर पोलिस स्टेशन हद्दीतील योगेश उर्फ भु-या वसंत चव्हाण (रा.  बजरंगपुरा जामनेर) अशी कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

रमन नामदास याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध एकवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून एक अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. योगेश चव्हाण याच्याविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला सहा गुन्हे दाखल असून चारवेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment