कसारा घाटात झाला भीषण आपघात

On: August 28, 2020 6:46 PM

नाशिक : नाशिक- मुंबई लेन वर कसारा घाटातून जाणा-या कांद्याच्या ट्रकला आज भिषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून दोघांना किरकोळ मार लागला आहे. नाशिक जिल्हयाच्या लासलगाव येथून मुंबईला कांद्याने भरलेला ट्रक कसारा घाटातुन जात होता. दरम्यान अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. चालकाने आपल्या ताब्यातील ट्रकचा वेग आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही.

त्यामुळे चालकाच्या ताब्यातील ट्रक रस्त्यालगतच्या दरडी वर जाऊन कोसळला. या धडकेत चालक कॅबीनमधे बसलेले तिघे अडकून पडले. उर्वरीत दोघांना विस मिनिटात काढण्यात आले. वाहनाच्या चेसीसमधे अडकून पडलेल्या चालकास आपत्ती व्यवस्थापन पथक, महामार्ग पोलीस, पीक इन्फ्रा पथकाला सुमारे दोन तास अथक प्रयत्न करावे लागले. त्यानंतर चालकाला बाहेर काढता आले. चालकाच्या एका हाताला जबर इजा झाली असून कपाळाला देखील मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी शिवशक्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment