यावल तालुक्यातील अकलुद येथे धाडसी घरफोडी

On: January 30, 2024 6:59 PM

जळगाव : यावल तालुक्यातील अकलुद या गावी प्रॉपर्टी ब्रोकरच्या बंद घराचा लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली  आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्या चांदीचे दागीने व पाच  लाख रुपये रोख असा एकुण 11 लाख 7 हजार 900  रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

राजेश गुनधरजी नखाते (जैन) हे अकलुद ता. यावल येथील रहिवासी आहेत. ते मुंबई येथे एका  सेमिनारसाठी गेले होते. त्यांची पत्नी नातेवाईकांकडे अकोला येथे गेली होती. 29  जानेवारी रोजी राजेश नखाते हे आपल्या मुलीसह मुंबई येथून अकलुद येथे घरी  परत  आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment