जळगाव : चोरीच्या पाच मोटार सायकलींसह चोरट्यास अटक करण्यात एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास यश आले आहे. दोंडाईचा जिल्हा धुळे येथील रहिवासी फैय्याज शकुर मनोवार असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे.
दोंडाईचा येथील रहिवासी मात्र जळगाव येथील सुप्रिम कॉलनीत राहणा-या फैय्याज यास कोणताही कामधंदा नसतांना तो चोरीच्या मोटार सायकली वापरत असल्याची माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले पथक पुढील तपासकामी रवाना केले होते. त्याच्या मागावर असलेल्या पथकाने शोध घेऊन देखील तो हाती लागत नव्हता. हवा असलेला फैय्याज मनीयार हा जळगाव शहरात असल्याची माहिती समजताच पथकाने त्याला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली. त्याने आपला गुन्हा कबुल करत चोरीच्या पाच मोटार सायकली पोलिस पथकाला काढून दिल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता तिन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या चोरीच्या दोन मोटार सायकली एमआयडीसी पोलीस स्टेशन, दोन मोटार सायकली जळगाव शहर पोलीस स्टेशन आणी एक मोटार सायकल ही दोंडाईचा पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आहेत. उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ, दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पोना, किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदीवे, सचीन पाटील, नाना तायडे, ललीत नारखेडे, किरण पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर आदींनी तपास पुर्ण केला.