जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तिघे हद्दपार

जळगाव : टोळीने गुन्हे करणा-या  तिघांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले  आहे. मुकेश प्रकाश भालेराव (रा. राहुलनगर भुसावळ), शामल शशिकांत सपकाळे (रा. न्यु सातारा भुसावळ), भरत मधुकर महाजन (रा. शिवपुर कन्हाळा रोड भुसावळ) अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

जळगाव जिल्हयात टोळीने गुन्हे करणा-या इसमांविरुध्द रितसर चौकशी पुर्ण करण्यात आली होती. त्या चौकशीअंती या तिघांची नावे निष्पन्न झाली व त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले  आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पोलीस स्टेशन, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, शनिपेठ पोलीस स्टेशन जळगांव, फैजपुर पोलीस स्टेशन, यावल पोलीस स्टेशन हददीत व परीसरात खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, जाळपोळ करणे, गंभीर दुखापत, दंगल, स्त्री अत्याचार, घातक हत्यार बाळगणे, दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला करणे, बेकायदा दारु बाळगणे, आदेशाचे उल्लंघन करणे, मारामारी दमदाटी शिवीगाळ करणे या सदराखाली या  गुन्हेगारांविरुद्ध एकुण 26 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here