जळगाव : जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. रवी उर्फ माया महादेव तायडे (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रवी तायडे याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनसह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिस स्टेशनला असे एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला होता. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या अख्त्यारीत या प्रस्तावावर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी सहायक फौजदार युनूस शेख ईब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोकॉ ईश्वर पाटील यांनी कामकाज केले. रवी तायडे याची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.