धावत्या  रेल्वे खाली इसमाची आत्महत्या – ओळख  पटवण्याचे आवाहन

On: February 4, 2024 6:33 PM

जळगाव : हरिविठ्ठल नगर नजीक रेल्वे लाईन लगत असलेल्या आत्महत्या कॉलनी परिसरातील रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष वयोगटातील आहे. रेल्वे डाऊन लाईनवर आज 4 फेब्रुवारीच्या दुपारी पावणे तिन  वाजेच्या सुमारास आढळून आलेल्या इसमची अद्याप ओळख  पटलेली नाही. ओळख  पटवण्याचे आवाहन रामानंद नगर  पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले  आहे.

मयत  इसमाच्या एका  हातावर जयभिम असे गोंदलेले असून धडापासून पाय  वेगळे झाले आहे. मयत  इसमाने टक्कल केले असून काळी टोपी, काळा शर्ट,व काळी फुल पॅंट असा  त्याचा पेहराव असून शरीराचा चेंदामेंदा झाला आहे. कुणाला या इसमाबाबत माहिती असल्यास अथवा ओळख  पटवण्याकामी तपास अधिकारी सहायक फौजदार संजय भांडारकर  यांचेशी 9823098404 अथवा 7738341022 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे. मयत इसम नजीकच्या परिसरातीलच असावा अशी शक्यता वर्तवली जात  आहे.       

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment