राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज सायुज्य समाधी सोहळा स्पर्धा – २०२४

On: February 8, 2024 9:32 PM

यावर्षी संपूर्ण भारतात जेथे सोनार समाजाचा अधिवास आहे, तेथे मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुण्यतिथी ऐवजी राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा व्हावा, असे आवाहन ऋग्वेद सुवर्ण वार्ता स्वर्णकार प्रसारवाहिनी, सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावर्षी स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या स्थानिक परिसरात आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज हरिऐक्य सायुज्य सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा किंवा कार्यक्रम पत्रिका दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऋग्वेद सुवर्ण वार्ता व्हॉट्सॲप वर शेअर करावी. तसेच दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानिक परिसरात होणाऱ्या राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज हरिऐक्य सायुज्य सोहळ्याची दोन  क्षणचित्रे, आणि एक ४ मिनिटांचा व्हिडिओ 9325485472 या व्हॉट्सॲप क्रमांकावर दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी शेअर करावेत, असे आवाहन आयोजक रुग्वेद सुवर्ण वार्ता, स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी, सकल भारतीय सोनार समाज संघटन, सेतुबंधन मधील सर्व सोनार समाज संस्था आणि संघटना आदींनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment