अशोकभाऊ जैन एक उत्तुंग व्यक्तिमत्व

On: February 10, 2024 3:55 PM

जळगाव : जळगावच्या जैन उद्योग समुहाचे सुप्रिमो अशोकभाऊ जैन यांचा आज 10 फेब्रुवारी रोजी वाढदिवस. जळगाव ही कर्मभुमी असलेल्या अशोकभाऊ यांच्या उद्योगसमुहाचे जाळे केवळ जळगावच नव्हे तर  भारतासह जगाच्या पाठीवर विविध देशात पसरले आहे. पिताश्री सन्माननिय भंवरलालजी जैन यांचे अनमोल आशिर्वाद आणि प्रेरणा या कधीही न संपणा-या बळावर अशोकभाऊ जैन यांनी आपला उद्योगसमुह जपला आणि वाढवला आहे.

जैन उद्योगसमुहात केवळ शेतीला लागणा-या वस्तूंचे उत्पादन होत नाही तर याठिकाणी माणसे घडवण्याचे आणि घडलेली माणसे जपण्याचे देखील उत्पादन होत असते. हेच या उद्योगसमुहाच्या यशाचे गमक म्हटल्यास वावगे होणार नाही. समाजाच्या प्रत्येक घटकाची कडी आपल्यासोबत जोडून ठेवण्यात यशस्वी झालेले अशोकभाऊ एक यशस्वी उद्योजक देखील ठरले आहेत. हा यशस्वी उद्योजकाचा वारसा त्यांना पिताश्री भंवरलालजी जैन यांच्याकडून मिळाला असून त्यांनी तो आपल्या शैलीतून फुलवला आणि वाढवला आहे हे कुणा ज्योतिष्याने वेगळे सांगण्याची गरज नसावी.

सहसा उद्योजक म्हटला म्हणजे केवळ नफा आणि तोटा आणि त्यातल्या केवळ नफा हे एकच उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम केले जाते. मात्र अशोकभाऊ जैन हे एक वेगळेच रसायन म्हणावे लागेल. ज्यावेळी सन 2020 मधे कोरोना या विषाणूने जगभरात कहर केला होता. त्या कठीण काळात अशोकभाऊ जैन यांच्या संकल्पनेतून स्नेहाच्या शिदोरीचा उगम झाला. गोरगरीब आणि अनाथांचे नाथ म्हणून अशोकभाऊ या संकटकाळात धावून आले. कोरोना कालावधीत सुरु झालेली स्नेहाची शिदोरी आजही अव्याहतपणे सुरु आहे. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही पिताश्री भंवरलालजी जैन यांची संकल्पना प्रत्येक सेवेमागे असल्याची भावना अशोकभाऊ यांनी एकदा व्यक्त केली होती.  

With Honourable Anil Joshi Vice president (Media) Jain irrigation systems Limited

साहित्य, कला, सांस्कृतीक, सामाजिक, क्रिडा अशा एक ना अनेक बाजू त्यांनी आपल्या शैलीने, आपल्या उद्योगसमुहाच्या माध्यमातून जपल्या आहेत. त्यातून प्रत्येक क्षेत्रातील लहानमोठे घटक जैन उद्योगसमुहासोबत जोडले गेले. असे प्रत्येक घटक मिळून एक जनसागर अशोकभाऊंसोबत जोडला गेला. आज अशोकभाऊ जैन यांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेला जनसागर बरेच काही सांगून जातो. अशोकभाऊ जैन यांचे कर्तृत्व असेच उत्तरोत्तर वाढत जावो हीच त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment