तलवारीसह हद्दपार आरोपीस अटक

On: February 10, 2024 9:35 PM

जळगाव : हद्दपार आरोपीस तलवारीसह एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध  पथकाने ताब्यात घेत अटक  केली आहे. विशाल मुरलीधर दाभाडे (रामेश्वर कॉलनी जळगाव) असे दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या अटकेतील आरोपीचे नाव आहे.

विशाल दाभाडे हा जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात तलवारीसह फिरत असल्याची माहिती पो.नि. बबन  आव्हाड यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्याला सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना योगेश बारी, सुधीर सावळे, विकास सातदिवे, पोकॉ नितीन ठाकुर, मुकेश पाटील, नाना तायडे, किरण पाटील आदींनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून एक  लोखंडी तलवार देखील हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला पाच आणि रामानंद नगर  पोलिस स्टेशनला दोन असे एकुण पाच  चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment