माजी नगरसेवकावरील गोळीबार घटनेतील दोघांना अटक

On: February 13, 2024 3:14 PM

जळगाव : चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेतील दोघा फरार संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक  केली आहे. सचिन सोमनाथ गायकवाड (रा. घाटरोड, चाळीसगाव) आणि अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख (रा. हुडको चाळीसगाव) अशी  अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांच्यावर दि. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी भा.द.वि. 302  हे कलम नंतर वाढवण्यात आले होते. घटनेनंतर पळून जाण्यात यशस्वी झालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणीकंद पुणे परिसरातून अटक करण्यात सफलता मिळवली. पो. नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ. लक्ष्मण अरुण पाटील, पोना राहुल जितेंद्रसिंग पाटील यांचे पथक अहमदनगर व पुणे येथे रवाना झाले होते. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना पुण्याच्या लोणीकंद परिसरातून जेरबंद करण्यात आले. या कारवाईत हे.कॉ. अक्रम शेख याकुब, पोहेकॉ महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ. शिवदास नाईक, पोना हेमंत पाटील, पोना किशोर मोरे, पोकॉ. ईश्वर पंडीत पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment