जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणी एकास अटक

On: February 16, 2024 10:37 AM

जळगाव : भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे या गावी झालेल्या खूनाचा तपास भुसावळ तालुका पोलिसांच्या पथकाने लावला आहे. या घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण गणेश शिराळे (रा. शेलवड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.

सदाशिव राजाराम डहाके (रा. पिशोर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. मयत सदाशिव डहाके हे कु-हे पानाचे या गावी गेल्या पंधरा दिवसापासून अण्णा शिंदे यांच्या शेतात कामाला होते. अटकेतील संशयीत लक्ष्मण शिराळे आणि मयत सदाशिव डहाके यांच्यातील जुन्या वादातून हा खून  झाल्याचे म्हटले जात आहे.

शेतमालक अण्णा शिंदे हे त्यांच्या खळ्यामधे 14 फेब्रुवारी रोजी म्हशींचे दुध काढण्यासाठी गेले असता त्यांना सदाशिव डहाके हे मयत अवस्थेत आढळून आले. त्यानंतर हा खूनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेप्रकरणी सुरुवातीला भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली. तपासाअंती वैद्यकीय अहवालानुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पळून जाण्याच्या बेतात असलेल्या संशयीत आरोपी लक्ष्मण गणेश शिराळे याला शिताफीने अटक करण्यात आली आहे. जुन्या वादातून झालेल्या या खूनाचा पुढील तपास  उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. विठ्ठल फुसे, सपोनि अमोल पवार, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे, पोहेकॉ संजय तायडे, युनुस शेख, प्रेमचंद सपकाळे, दीपक जाधव, वाल्मीक सोनवणे, आत्माराम भालेराव, रियाजोद्दीन काझी, पोना कैलास बाविस्कर, जितेद्र साळुंखे, पोकॉ उमेश बारी, रशिद तडवी आदी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment