जळगाव : तिन गावठी कट्टे, आठ जीवंत काडतुस सोबत बाळगणा-या तिघांना 8 लाख 42 हजार 500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. जफर रहीम शेख (रा. भाजी बाजार घोड नदी ता. शिरुर जि पुणे), तबेज ताहीर शेख (रा. सेंटर दवाखान्या समोर रिव्हेलीन कॉलनी ता. शिरुर जि. पुणे) आणि कलीम अब्दुल रेहमान सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
चोपडा तालुक्यातील सत्रसेन मार्गे एक राखाडी रंगाच्या एरटीगा वाहनाने तिघे तरुण गावठी कट्टे घेऊन निघाल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे रात्र गस्तीच्या पोलिस कर्मचा-यांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेत पुढील कारवाई केली. अंगझडतीदरम्यान तिघांकडून विनापरवाना तिन गावठी कट्टे, आठ जीवंत काडतुस आणि 8 लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनला हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या प्रभारी पोलीस अधिकारी कावेरी कमलाकर यांच्यासह पो.ना. शशिकांत पारधी, चालक पो.हे.का. किरण आसाराम धनगर, स. फौ. राजु महाजन, सफौ देवीदास ईशी, पोकॉ. प्रमोद पारधी, पोकॉ मनिष गावीत, पोकॉ विनोद पवार, पोकॉ महेंद्र भिल, पोकॉ सदिप निळे, होमगार्ड श्रावण तेली, होमगार्ड संजय चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.