बांधकाम साहित्य चोरणा-या तिघांसह भंगार व्यावसायीक जेरबंद

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या बांधकाम साहित्य चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकुण चौघांना जेरबंद करण्यात आले आहे. दिनांक 20 व 21 फेब्रुवारी अशा सलग  दोन दिवशी जळगाव तालुक्यातील वावडदा आणि जळगाव शहरातील पुरुषोत्तम नगर  भागात हे गुन्हे घडले होते.

दिनांक 20 फेब्रुवारी रोजी वावडदा गावातील मारुती मंदीराच्या निर्माणाधिन कामावरुन बांधकाम साहित्य चोरी झाल्याप्रकरणी विनोद तुळशीराम गोपाल यांनी फिर्याद दिली होती. या घटनेप्रकरणी सागर विनोद चव्हाण आणि विनोद रमेश गोपाळ या वावडदा येथीलच दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांनी आपला गुन्हा कबुल केला असून त्यांच्या ताब्यातील चोरीचे बांधकाम साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.    

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी जळगाव शहराच्या शिरसोली नाका परिसरातील अजय जोशी यांच्या निर्माणाधिन वास्तूचे बांधकाम साहित्य चोरी झाले होते. या घटनेप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी शेख फैयाज शेख शमसोद्दीन (रा, फुकटपुरा तांबापुर) यास अटक करण्यात आली आहे. त्याने आपला गुन्हा कबुल केला. तसेच त्याने चोरीचे साहित्य भंगार व्यावसायीकास विक्री केल्याचे देखील कबुल केले. चोरीचे साहित्य खरेदी करणारा भंगार व्यावसायीक शेख रहीम शेख खलील (रा. बॉम्बे बेकरीजवळ मलीक नगर जळगाव) याला देखील अटक  करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आसाराम मनोरे, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ. रामकृष्ण पाटील, प्रदीप पाटील, स्वप्नील पाटील, पोना. सचीन पाटील, योगेश बारी, राहुल रगडे, विशाल कोळी, मनोज पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर आदींनी या  कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here