चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक 

On: February 27, 2024 8:03 PM

जळगाव : चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या तिन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. धिरज अरुण कानडे (रा. आडगाव ता. एरंडोल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे.    

जळगाव आकाशवाणी चौकात त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील कारवाईकामी त्याला चाळीसगाव शहर  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोना राहुल बैसाने, पो.कॉ. हेमंत पाटील आदींनी या कारवाई  व तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment