सोने विकत घेण्यासाठी सुरु होतेय सुवर्ण बॉंड योजना

काही वर्षांपासून मोदी सरकार फिजिकल सोन्याची योजना चालवत आहे. या योजनेला ‘सुवर्ण बॉन्ड योजना असे म्हटले जाते. या योजनेच्या अंतर्गत मोदी सरकार पुन्हा एकदा सोने विक्री करत आहे. सरकार बॉन्डच्या स्वरुपात सोन्याची विक्री करते. या सोन्याचे दर आरबीआय कडून ठरवले जातात. आरबीआय या सोन्याचे दर जारी करत असते. या सोन्याचे दर बाजारातील सोन्याच्या तुलनेत कमी असतात.

आरबीआयने यावेळी सुवर्ण बॉन्डचा दर 5,117 रुपये प्रति ग्रॅम असा ठेवला आहे. सुवर्ण बॉन्डच्या खरेदी डिजिटल पद्धतीने खरेदी केल्यास प्रति ग्रॅम 50 रुपयांची सुट दिली जाणार आहे. अशा गुंतवणूकदारांच्या बॉन्डची किंमत प्रति ग्रॅम 5,067 रुपये एवढी राहणार आहे. सदर योजना 31 ऑगस्टला सुरु झाल्यानंतर 4 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत किमान एक ग्रॅम सोने खरेदी करता येणार आहे. हे सोने खरेदी करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक, बीएसई, एनएसईची वेबसाईट किंवा पोस्ट ऑफीससोबत संपर्क साधावा लागणार आहे.आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आरबीआयकडून दहा हप्त्यात एकूण 2,316.37 कोटी रुपये अर्थात 6.13 टनांचे सुवर्ण बॉन्ड जारी करण्यात आले आहेत. कोरोना काळात 6 महिन्यांपासून हे बॉन्ड जारी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here