कोरोनामुळे प्रत्येकाचे कमी अधिक नुकसान झाले आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी अनेक लोकांनी चलनातील नोटादेखील सॅनेटायझरने धुवून स्वच्छ केल्या. नोटा स्वच्छ धुतल्यानंतर त्या उन्हात वाळवल्यामुळे चलनी नोटांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खराब झालेल्या 2 हजारांच्या 17 कोटी मूल्याच्या नोटा रिझर्व बॅंकेकडे आल्या आहेत. याशिवाय 200, 500, 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचीही स्थिती दयनीय झालेली होती. बँकेतील नोटांच्या बंडलांवर देखील सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. याचा परिणाम म्हणून नवीन चलन एका वर्षातच खराब झाले आहे.