शासकीय रुग्णालयाच्या बांधकाम साहित्याची चोरी करणारे जेरबंद

जळगाव : जळगाव शहरात मोहाडी रस्त्यावर शासकीय महिला रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या निर्माणाधिन इमारतीसाठी लागणा-या बांधकाम साहित्याची 2 मार्चच्या रात्री चोरी झाली होती. या घटनेप्रकरणी ठेकेदार आयुष कमलकिशोर मणियार यांनी अज्ञात इसमाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला होता.  

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पो.नि. बबन आव्हाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सतबिरसिंग बलवंतसिंग टाक (रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव), गुरुजितसिंग सुजाणसिंग बावरी (रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव) आणि तंजीम बेग नसीम बेग मिर्झा (रा. टिपू सुलतान चौक, तांबापुरा, जळगाव) या तिघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांना अटक करण्यात आली.

न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडी दरम्यान त्यांच्याकडून चोरी झालेल्या साहीत्यापैकी 97 हजार रुपये किंमतीचे बांधकाम साहीत्य हस्तगत करण्यात आले. याशिवाय त्यांनी गुन्हयात वापरलेली रिक्षा आणि मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. अटकेतील गुरुजीतसिंग सुजाणसिंग बावरी याने अयोध्या नगरातील रहिवासी नरेंद्र मानसिंग पाटील यांच्याकडे गेल्या वर्षी घरफोडी केल्याचे कबुल केले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल हा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. अटकेतील सतबिरसिंग याच्याविरुद्ध यापुर्वी चोरी – घरफोडीचे 19, गुरजितसिंग याच्याविरुद्ध 11 आणि तंजीम बेग मिर्झा याच्याविरुद्ध 3 गुन्हे दाखल आहेत. अटकेतील तिघेही एमआयडीसी पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगार आहेत. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पो.उप. निरी. दत्तात्रय पोटे, पो.उप. निरी. दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, पो.ना. किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे आदींनी या तपास व कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here